इंदापूर: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांना जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या विजयामुळे इंदापूर बाजार समितीवर पाटील घराण्याचं गेल्या 56 वर्षाचं साम्राज्य खालसा झालं आहे.
विधानसभेत राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला. आता बाजार समितीची सत्ताही ताब्यात घेतली आहे. आज झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 12 उमेदवार निवडून आले तर काँग्रेसचे 7 उमेदवार विजयी झाले. पण हर्षवर्धन पाटलांची सत्ता गेली आहे.
त्यामुळे येत्या काळात इंदापुरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय नगरपालिका निवडणुकीत काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. इंदापूरमध्ये अजित पवारांनीही हर्षवर्धन पाटलांच्या पराभवासाठी विशेष प्रयत्न केले होते.