रॅश ड्रायव्हिंगनंतर वाद, रायडूची कारमधून उतरुन वृद्धाला धक्काबुक्की
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2017 06:32 PM (IST)
घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी हा वाद जागीच सोडला. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हैदराबाद : टीम इंडियाचा क्रिकेटर अंबाती रायडूवर वृद्धाला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. रायडू हैदराबामध्ये बेदरकारपणे कार चालवत होता, ज्यामुळे सकाळच्या वेळी रस्त्याने चालणाऱ्या वृद्धांना त्याच्या कारचा धक्का लागला. वृद्धांनी रायडूला याबाबत जाब विचारल्यानंतर त्याने संतापून उतरत वृद्धांशी छटापट केली. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी हा वाद जागीच सोडला. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आल्याचीही माहिती आहे. रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करतो. तर टीम इंडियाचंही त्याने प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातून तो बाहेर आहे. पाहा व्हिडिओ : https://twitter.com/ANI/status/903236166509510656