कोलंबो: श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे अध्यक्ष सनथ जयसूर्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेपाठोपाठ वन डे सामन्यांच्या मालिकेतही मिळवलेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर, जयसूर्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.



भारताविरुद्धच्या अखेरच्या दोन वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीचा संघ आधीच निवडण्यात आला आहे. पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाला गरज भासल्यास, सहा सप्टेंबरच्या अखेरच्या सामन्यापर्यंत जयसूर्या आणि त्यांचे विद्यमान सहकारीच निवड समितीचा कार्यभार सांभाळतील.