कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला ओलांडणारा सर्वात युवा फलंदाज हा विक्रम आजवर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत दहा हजार धावा पूर्ण केल्या तेव्हा तो 31 वर्ष आणि 326 दिवसांचा होता. अॅलेस्टर कूकने हा विक्रम वयाच्या 31 वर्ष आणि 157व्या दिवशी रचला.
सचिनचा 11 वर्षांपूर्वीचा विक्रम कूक मोडणार?
चेस्टर ले स्ट्रीट कसोटीच्या पहिल्या डावात कूकने 15 धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या डावाआधी दहा हजार धावांच्या टप्प्यापासून तो केवळ पाच धावांनी दूर होता. अखेर कूकने प्रदीपच्या गोलंदाजीवर चौकार लगावून, कारकीर्दीतल्या 128व्या कसोटीत दहा हजार धावांची वेस ओलांडली.
अॅलेस्टर कूक हा कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पार करणारा आजवरचा बारावा आणि इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला.