मुंबई : मुंबई ‘अंडर-16’ संघात प्रणव धनावडेची निवड झाली नाही आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड झाली, यावरुन सोशल मीडियात तुफान वाद-विवाद सुरु झाले आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स्अप या माध्यमांमधून प्रणवला एकलव्य, तर अर्जुनला आधुनिक अर्जुन म्हटलं जात आहे.

 

प्रणव धनावडेने शालेय क्रिकेटमध्ये नाबाद 1,009 धावा करत विश्वविक्रमाची नोंद केली आहे. यानंतर प्रणवची चर्चा जगभरात सुरु झाली. क्रिकेटच्या इतिहासात नाबाद विक्रमी खेळी करणारा प्रणव हा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला.

 

या विश्वविक्रमी कामगिरीबद्दल सचिन तेंडुलकरसह जगभरातील अनेक दिग्गजांनी प्रणवला शुभेच्छा दिल्या. मात्र, आता प्रणवऐवजी अंडर-16 संघात अर्जुन तेंडुलकरची निवड झाल्याने सोशल मीडियात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

https://twitter.com/DalitSamajIndia/status/736749535813242881

प्रणवची निवड न झाल्याने मोहन क्षोत्रिय यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की, “यह तो होना ही था... कांबली के साथ भी हुआ था न? प्रणव धनावडे हमारे समय का एकलव्य.”

https://twitter.com/CGyrish/status/736418356958400512

पत्रकार शाहीद नक्वी यांनी लिहिलं आहे की, “राजकारणात घराणेशाही येते, त्यावेळी टीका होते. मात्र क्रिकेटमध्ये घराणेशाही आल्यास लोक उत्सुकतेने वाट पाहतात.”

https://twitter.com/DalitOnLine/status/736226601138954241

दलित समाज इंडियाने ट्वीट केला आहे की, “सचिन तेंडुलकरने या भेदभाव आणि अन्यायावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे.”

https://twitter.com/Ajinkya_2022/status/736796057854726144

दलित नेते अशोक भारती यांनी ट्वीट केला आहे की, “अर्जुन तेंडुलकर अंडर-16 मध्ये का? प्रणव धनावडे का नाही? प्रणव धनावडे सचिन तेंडुलकरचा मुलगा नाही म्हणून त्याची निवड झाली नाही का?”

 

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रणव आणि अर्जुनबाबत अनेक पोस्ट फिरत आहेत. अनेकांनी अर्जुनच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, काहीजण अर्जुनच्या बाजूनही उभी असल्याचे दिसत आहेत.