हैदराबाद : बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी करुण नायरच्या जागी मुंबईकर अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे. हैदराबादमध्ये 9 फेब्रवारी रोजी हा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
"करुण नायरची कामगिरी चांगलीच होती. पण एका सामन्यातील अपयशामुळे अजिंक्य रहाणेची दोन वर्षांची कठोर मेहनत झाकोळली जाऊ शकत नाही. अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी क्रिकेट संघातील उत्कृष्ट फलंदाज आहे,"असं म्हणत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अजिंक्य रहाणेवर स्तुतीसुमनं उधळली.
https://twitter.com/ANI_news/status/829222589591584769
याआधी बोटाच्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं होतं. त्याच्या जागी संधी मिळालेल्या करुण नायरने शेवटच्या सामन्यात त्रिशतक झळकावलं होतं.
अजिंक्य रहाणे की करुण नायर यांच्यापैकी कोणाची निवड करायची असा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला होता. परंतु अजिंक्य रहाणे बोटाच्या दुखापतीतून सावरल्याने करुणऐवजी त्याला संधी देण्यात आली.