मुंबई : केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्सनं ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेची आपल्या आयपीएल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेऱ्यानं रंगेहाथ पकडलं आहे. या अखिलाडू कृतीस एकटा बॅनक्रॉफ्ट दोषी नसून, त्या कृतीमागे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्त्वगटाचा निर्णय असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं दिली होती. त्यानंतर आयसीसीनं स्मिथवर एका कसोटी सामन्याची बंदी आणि मानधनाच्या शंभर टक्के रकमेचा दंड अशी कारवाई केली होती.
आता राजस्थान रॉयल्सनंही स्मिथची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपलं
संबंधित बातम्या :
IPL 2018: स्टिव्ह स्मिथऐवजी रहाणे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार?
क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना
मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होणार?
स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई
स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा, ऑस्ट्रेलिया सरकारचे आदेश
चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद
स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Mar 2018 03:33 PM (IST)
केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्सनं ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेची आपल्या आयपीएल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -