नागपूर: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन करणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराचं वय आणि त्याचं संघातील स्थान यावर काही जणांकडून टीका करण्यात येत आहे. 'मला लय सापडण्यासाठी फक्त एक मॅचही पुरेशी असते.' असं उत्तर आशिष नेहरानं आपल्या टीकाकारांना दिलं.
नेहरानं इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात लागोपाठ दोन चेंडूंवर दोन गडी बाद केले. या सामन्यात भारत 5 धावांनी विजय मिळवला होता.
दरम्यान, यानंतर बोलताना नेहरा म्हणाला की, 'मी वनडे खेळत असू किंवा टी-20 माझ्या सरावात काहीच कमरतता नसते. मला लय प्राप्त होण्यासाठी फक्त एक सामना पुरेसा असतो.' भारतात झालेल्या टी20 विश्वचषक आणि आयपीएलनंतर नेहरानं दुखापतीमुळे काही काळ विश्रांती घेतली होती.
'जोवर तुम्ही फिट आहात तोपर्यंत तुम्ही खेळू शकता. त्यामध्ये तुमचं वय आड येऊ शकत नाही.' असंही नेहरा म्हणाला.
'मला माहित आहे की, फीट राहणं तसं कठीण आहे. कारण की, मी एक वेगवान गोलंदाज आहे. पण मी माझा खेळ एन्जॉय करतो. जोवर मी फीट आहे तोवर मी खेळत राहणार. मी सात-आठ महिन्यापासून मागील एकही सामना खेळलो नव्हतो.' असं नेहरा म्हणाला.