नागपूर: पत्नीला विष पाजून, पतीनं देखील विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. मुकेश पाटील असं आत्महत्या करणाऱ्या इसमाचं नाव असून, तो  नागपूरच्या कोलबा स्वामी नगरमध्ये राहत होता.


सुदैवानं मुकेशची पत्नी रोशनी ही बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दोघांमधील वादातून मुकेशनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मुकेश पाटीलच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.