लाहोर: 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड, तसंच जमात -उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तान सरकारनं नजर कैदेत ठेवलं आहे. पण हाफिज सईदनं याचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फोडलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे आपल्याला नजर कैद केल्याची बोंब हाफिज सईदनं ठोकली आहे.


पाकिस्तान सरकारनं लाहोरमध्ये असलेला हाफिज सैदला नजर कैदत ठेवलं आहे. तसंच पाकिस्तान सरकार हाफिजची संघटना जमात- उद -दावावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पण यासाठी सईदनं मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्री पूर्ण संबंधांना जबाबदार धारुन ही कारवाई केली जात असल्याचं म्हटलं आहे.


हाफिजला नजरबंद केल्यानंतर एक व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने गरळ ओकली आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान सरकारने बाहेरच्या दबावामुळे आपल्याला नजर कैद केल्याचं त्यानं सांगितलं आहे. तसेच, डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नव्याने मैत्री सुरु झाली आहे. मोदींच्या सांगण्यावरुनच अमेरिकेच्या दबावामुळे आपल्याला नजर कैद करण्यात आल्याची गरळ त्यानं ओकली आहे.

या व्हिडिओमधून त्याने आपले अमेरिकेशी शत्रूत्व नसल्याचंही नमुद केलं आहे. ''आपण काश्मीर प्रश्नावर संघर्ष करत असून, पाकिस्तानची जनता आपल्या सोबत आहे. आपण कधीही हिंसेचा मार्ग आवलंबला नसल्याचं,'' त्यानं  ऊर बडवून सांगितलं आहे. तसेच काश्मीरप्रश्नी भारताच्या दबावामुळे आपल्याला नजर कैद केल्याचं त्यानं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद नजरकैदेत

मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एंट्री : ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प आता पाकिस्तानवरही बंदी घालणार?

इराणचं अमेरिकेला जशास तसं उत्तर, अमेरिकन नागरिकांना इराणमध्ये ‘नो एंट्री’