याआधी अष्टपैलू क्रिकेटर म्हणून रवींद्र जडेजाने चांगेल प्रदर्शन केले आहे. परंतु जडेजा गेल्या वर्षभरापासून आऊट ऑफ फॉर्म आहे, अशी त्याच्यावर टीका होत आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या वन डे मालिकेतही त्याला संघातून वगळण्यात आले होते. परंतु हार्दिक पंड्यानं माघार घेतल्यामुळे जडेजाला संधी देण्यात आली. त्याला तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यामध्येही त्याने क्रिकेटरसिकांना नाराज केले होते. त्यामुळे जडेजाची निवड सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे.
जडेजाने ट्वीट करुन भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जडेजाचे ट्वीट रीट्वीट करत त्याचे आभार मानले आहेत. तसेच वर्ल्डकपसाठी संघात निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदनही केले आहे.
VIDEO | विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड | एबीपी माझा
विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी