टी20 वर्ल्ड कपनंतर  भारतीय संघाला नवीन कोच मिळणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20  वर्ल्ड कपनंतर  समाप्त होणार आहे. पुढील दोन महिन्यानंतर भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे.  सध्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अनिल कुंबळेच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनिल कुंबळेच्या नावाबरोबर वीवीएस लक्ष्मणचे देखील नाव समोर येत आहे. 


कुंबळे 2016-17 या साली भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. कॅप्टन विराट कोहलीशी झालेले मतभेदानंतर चॅपियन्स ट्रॉफीच्या अंतीम सामन्यातील अपयशानंतर कुंबळे यांनी आपला राजीनामा दिला होता.


Virat Kohli Steps Down : विराटनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार?


सध्या अनिक कुंबळे पुन्हा कोच बनण्यास तयार आहे की नाही याबाबत शंका आहे. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, अनिल कुंबळे यांना ज्या पद्धतीने राजीनामा द्यावा लागला ते योग्य नाही. ज्या पद्धतीने नव्या सीओएने कोहलीच्या दबावाखील येत त्यांना काढले हे योग्य नाही. दरम्यान आता कुंबळे आणि लक्ष्मण प्रशिक्षक बनण्यास तयार होणार की नाही या वर पुढील गोष्टी अवलंबून आहे.



भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20  वर्ल्ड कपनंतर  समाप्त होणार आहे. बीसीसीआय रवि शास्त्री यांचे कॉन्ट्रॅक्ट दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापर्यंत वाढवण्याची तयारीत होती. परंतु रवि शास्त्री यांना कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यास नकास दिला. त्यामुळे बीसीसीआयला टी-20  वर्ल्ड कपनंतर नव्या कोचची गरज आहे. 


अनिल कुंबळे सध्या आयपीएलच्या पंजाब किंग्सचे कोच आहेत. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांनी राजीनाम्यात कर्णधार विराट कोहलीला आपल्या काम करण्याची पद्धत आवडत नसल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याअगोदर पंजाब किंग्जचा राजीनामा द्यावा लागेल