Who Will Be Next T-20 Captain of Indian Team : भारतीय क्रिकेट संघाचा  (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे  आपल्या राजीनाम्याची  घोषणा केली आहे. आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर (T-20 World Cup)  टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. आता कर्णधार विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर कर्णधार पदाची धुरा कोणाकडे जाणार या विषयी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माचे नाव कर्णधारपदासाठी समोर येत आहे. मात्र राजीनाम्यानंतर ऋषभ पंथच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे.


Kohli Leaves T20 Captaincy: टी -20 वर्ल्डकपनंतर टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीची मोठी घोषणा!


रोहित शर्मा (Rohit Sharma)


भारतीय क्रिकेट संघाचा  सलामीवीर रोहित शर्माला  टी-20 चे कर्णधारपद मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कारण विराट कोहलीनंतर क्रिकेटच्या वर्तुळात  रोहित शर्माचे नाव समोर येत आहे. कर्णधार पदामुळे कोहली आणि रोहितमध्ये खटके उडाल्याच्या बातम्या आल्या होत्या परंतु त्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत दोन्ही खेळाडूंनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत टी20 इंटरनॅशनलमध्ये 19 सामन्यांपैकी 14 सामने जिंकले आहे. 


ऋषभ पंत 


ऋषभ पंतला टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार बनवण्याची शक्यता आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत रोहित शर्माचे नाव जरी पुढे असले तरी ऋषभ पंत देखील या शर्यतीत आहे. ऋषभ पंतने सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपीटल्सचे नेतृत्त्व करत आहे


टी20 इंटरनॅशनलमध्ये विराटच्या नेतृत्त्वाखाली भारताने 45  सामने खेळले आहेत. त्यापैकी 29 सामन्यात भारत जिंकला आहे तर 14 सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. हारला तर दोन सामने अनिर्णयीत होते


कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली कर्णधार असेल
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हे स्पष्ट केले आहे की, तो वनडे आणि कसोटीत भारताच्या कर्णधारपदी तो कायम राहील. त्याने रोहितला टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधार करण्याचं सुचवलं आहे. त्याने रोहितच्या नेतृत्व गुणवत्तेचीही प्रशंसा केली.