मुंबई : सैय्यद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटच्या सुपर लीगसाठी मुंबईने संघाची घोषणा केली आहे. संघातील यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरेच्या खांद्यावर मुंबईची धुरा सोपवण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या अकराव्या मोसमासाठी होणाऱ्या लिलावापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याची खेळाडूंकडे ही अखेरची संधी असेल. सुपर लीगचे सामने कोलकात्यात 21 जानेवारीपासून सुरु होतील. यामध्ये पाच भागातील प्रत्येकी दोन संघ पात्र ठरतील.
  • पश्चिम विभागातून बडोदा आणि मुंबईने सुपर लीगमध्ये स्थान पक्क केलं आहे.
  • नॉर्थ भागातून दिल्ली आणि पंजाब आहे.
  • पूर्व भागातून स्थान पक्क करण्यात पश्चिम बंगाल आणि झारखंडला यश मिळालं आहे.
  • दक्षिण विभागातून कर्नाटक आणि तामिळनाडूने जागा मिळवली आहे
  • मध्य विभागातून राजस्थान आणि उत्तर प्रदेशने स्थान पक्क केलं आहे.
सुपर लीगसाठी निवडलेल्या मुंबईच्या संघात अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णी, सलामीवीर फलंदाज जय बिस्ता, अखिल हेरवाडेकर, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड आणि दुखापतीतून सावरलेल्या श्रेयश अय्यरचाही समावेश आहे. मुंबईचा संघ : आदित्य तारे (कर्णधार) , धवल कुलकर्णी (उपकर्णधार), अखिल हेरवाडेकर, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शशांक सिंह, श्रेयस अय्यर, आकाश पार्कर, ध्रुमिल मातकर, शार्दुल ठाकूर, एकनाथ खेडकर, परिक्षित वालसांगकर, शम्स मुलानी और तुषार देशपांडे.