मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेच्या नियुक्तीचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी स्वागत करतानाच भारतीय क्रिकेटला आता 'अच्छे दिन' येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.


 

कुंबळेच्या नियुक्तीनंतर एनडीटीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत गावसकर म्हणाले की, कोच होण्य़ासाठी तुम्हाला कोणत्याही डिग्रीची अवश्यकता नसते. तर तुमच्याकडे व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य असणे गरजेचे आहे. कुंबळे यांच्य़ाकडे प्रशिक्षक पदाचा अनुभव नसला तरी ते त्यांच्याकडे व्यवस्थापनाचे कौशल्य आहे. ते आपल्या प्रतीभेने, अनुभव आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाला अच्छे दिन आणतील.

 

यावेळी त्यांनी कुंबऴे यांचे मुक्त कंठाने कौतुकही केले. ते म्हणाले की, अनिल कुंबळे यांचा तत्कालिन संघात खूप आदर केला जात होता. ड्रेसिंग रुममध्येही सर्व खेळाडू त्यांच्याशी आदबीने वागत. त्यांचे विक्रमांमुळे त्यांनी स्वत:ला कसे सिद्ध केले आहे, याचा नव्या पिढीने अभ्यास करावा. कुंबळेंच्या अनुभवाचा भारतीय संघाला उत्तम फायदा होईल.