सिनेमातील किसिंग सीन असे चित्रीत होतात!
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2016 03:29 PM (IST)
मुंबई : सध्याच्या जवळपास सगळ्याच सिनेमात किसिंग सीन्स असतात. पण अभिनेता आणि अभिनेत्री त्यांच्या सहकलाकारांना खरंच किस करतात, हे जर तुम्हाला खरं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्सही वापरल्या जातात. मोठमोठे लिपलॉक, किसिंग सीन्स कसे चित्रीत होत असतील, याचा तुम्ही विचार करत असाल. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या व्हिडीओमधून नक्की मिळेल. दक्षिण भारतीय सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री काजल अग्रवाल आणि अभिनेता सूर्या यांनी एकमेकांना किस कसा केला, याचं सत्य या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. 'मट्टर्रान' या सिनेमात काजल सुपरस्टार सुर्याला किस करताना दिसत आहे. पण प्रत्यक्षात तिने सूर्याला किस केलेलाच नाही. हे सगळं नकली आहे. या सिनेमातील किसिंग सीनसाठी दिग्दर्शकाने कोणती शक्कल लढवली तुम्हीच पाहा. पाहा व्हिडीओ