महाराष्ट्राच्या सागर मारकडला ५७ किलो, अक्षय हिरगुडेला ६५ किलो आणि कुमार शेलारला ७४ किलो गटात रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत महाराष्ट्राला एक सुवर्ण आणि तीन रौप्यपदकांसह सांघिक तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला.

सुवर्णविजेता पैलवान अभिजीत कटके २०१६ साली महाराष्ट्र केसरीचा उपविजेता, तर २०१७ साली महाराष्ट्र केसरी ठरला होता. त्यानं अंडर ट्वेन्टी थ्री गटाची राष्ट्रीय कुस्ती गाजवून आपल्या लौकिकात आणखी भर घातली.
अभिजीतच्या या यशात प्रशिक्षक अमर निंबाळकर, हणमंत गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे.