मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिअर्स क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. डिव्हिलिअर्सचं भारताशी जिव्हाळ्याचे नाते आहे. एकदा तर त्याने भारतातच राहण्याचे सुद्धा बोलून दाखवले होते.


दोन वर्षांपूर्वी आयपीएलच्या सामन्यांदरम्यान आरसीबीच्या डिजीटल टीमचा सदस्य मि. नाग्जने एबीला याबाबत विचारलं की, "तू बराच काळ भारतात असतोस, तर भारतीय नागरिकत्व का स्वीकारत नाहीस?" यावर सुपरमॅन एबी म्हणाला की, "नागरिकत्वासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलावं लागेल."

अर्थात हे सगळं थट्टेत सुरु होतं. पण भारतीय क्रिकेट चाहत्यांना ही कल्पना नक्कीच आवडली असती.

विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्स मैदानात एकमेकांना अतिशय कम्पॅटिबल आहेत. त्यामुळे ज्यावेळी डिव्हिलिअर्सने भारतात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू भारतीय क्रिकेट संघासाठी खेळावा, असं स्वप्न भारतातील क्रिकेटचाहत्यांनी पाहण्यास सुरुवात केली होती.

VIDEO : डिव्हिलिअर्सकडून निवृत्तीची घोषणा

https://twitter.com/ABdeVilliers17/status/999247658995810304

एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

वन डे कामगिरी

सामने – 228
धावा – 9577
शतकं – 25
अर्धशतकं – 53

कसोटी कामगिरी

सामने – 114
धावा – 8765
शतकं – 22
अर्धशतकं – 46

टी-20 कामगिरी

सामने – 78
धावा – 1672
शतकं – 0
अर्धशतकं - 10

संबंधित बातम्या :

मिस्टर 360 चा गुडबाय, एबी डिव्हिलियर्सची धक्कादायक निवृत्ती!

ऑलराऊंडर एबी डिव्हिलयर्सबाबत 10 इंटरेस्टिंग गोष्टी