मुंबईः रॉयल चॅलेंन्जर्स बेंगलोरचा दक्षिण आफ्रिकी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या फटकेबाजीनं धमाल उडवून दिली आहे. फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही डिव्हिलियर्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण तोच एबी किती बहुगुणी आहे याचा प्रत्यय नुकताच आला.

 

डिव्हिलियर्सचा गिटार वादन आणि गायन करतानाचा व्हीडियो रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरनं पोस्ट केलाय. यात डिव्हिलियर्सची पत्नी डॅनियलही त्याला साथ देताना दिसत आहे.

 

ज्युनिअर स्तरावर डिव्हिलियर्सनं क्रिकेटशिवाय हॉकी, रग्बी आणि टेनिसमध्येही ठसा उमटवला होता. करियर म्हणून त्यानं क्रिकेटची निवड केली. पण त्याचं गायक म्हणून हे वेगळं रूपही चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतंय. गेल्या वर्षीच डिव्हिलियर्स एका अल्बममध्येही झळकला होता.

 

पाहा व्हि़डीओः

https://twitter.com/ABdeVilliers17/status/736128550026153985