कसोटीतून निवृत्तीचा विचार नाही, डिव्हिलियर्सची स्पष्टोक्ती
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2017 11:41 PM (IST)
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने तो कसोटी क्रिकेटमधून इतक्यात निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानं त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आलं होतं. पण आपण केवळ त्या एकाच कसोटी मालिकेतून माघार घेतली असल्याचं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे. एबी कोपराच्या दुखापतीमुळं गेले सहा महिने संघाबाहेर होता. पण 25 जानेवारीला श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यातून तो पुनरागमन करणार आहे. 2019 सालचा वन डे विश्वचषक जिंकण्याचं आपलं लक्ष्य असल्याचंही डिव्हिलियर्सनं स्पष्ट केलं आहे.