Pakistan Cricket Team : पाकिस्तानची वर्ल्डकपच्या इतिहासात गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेली हाराकिरी सुरुच राहिली. टीम इंडियाने धुरळा उडवल्यानंतर अफगाणिस्तानने सुद्धा धुव्वा उडवत फक्त पाकिस्तानला नव्हे, तर अख्ख्या देशाच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले. बाकी पराभव पाकिस्तानला जिव्हारी लागले नाहीत, तितके या दोन संघांकडून स्वीकाराव्या झालेलं पराभाव जिव्हारी लागले. त्यामुळे बाबर आणि कंपनी पाकिस्तानात कधी येणार आणि कधी यांना कारवाईच्या फटक्यांनी फोडून काढतो, अशी स्थिती पाकिस्तानात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि माजी क्रिकेटपटूंची सुद्धा झाली होती. याची सुरुवात टीम निवडणाऱ्या निवड समितीपासून झाली. त्यामुळे पाकिस्तानच्या जन्मापासून विकास केला केला नसेल तेवढा धडाधड वेगाने गेल्या 75 तासात पाकिस्तानात घडल्या आहेत. 






निवड समिती अध्यक्षांचा राजीनामा 


पाकिस्तान संघाची हाराकिरी झाल्यानंतर वर्ल्डकपमधील साखळी सामने संपण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष माजी क्रिकेटर इंझमाम उल हक यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी फक्त राजीनामा दिला नाही, तर त्यांच्यार हितसंबंध जोपासल्याचा आरोप झाला. हा पहिला भूकंप झाल्यानंतर पाकिस्तान टीम मायदेशी परतल्यानंतर काय होणार याचा अंदाज आला होता. 


गोलंदाजी प्रशिक्षकांचा राजीनामा 


पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्नी माॅर्केल यांनी संघ रिकाम्या हाताने परतल्यानंतर लगेच राजीनामा देऊन टाकला. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी देवळातल्या घंटा वाजवल्यासारखी बडवली गेली. रिस रौफ वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शाहीन आफ्रिदीची सुद्धा धुलाई झाली. पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी अनेक विरोधी संघानी फोडून काढली होती. त्यामुळे पाकिस्तान संघाला किंमत मोजावी लागली आहे. 


बाबर आझमनं हकालपट्टी होण्यापूर्वीच डाव साधला 


एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात आणखी एक भूकंप झाला. बाबर आझमने टीम इंडियाची सेमीफायनल सुरु असतानाच तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. पाकिस्तान संघाने 9 पैकी फक्त 4 सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिले.बाबरला फलंदाजीत फारशी कमाल दाखवता आली नाही. अनेक दिग्गज आणि चाहत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाबरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. पहिल्यांदाच कर्णधारपद मिळाल्याच्या घटनेची आठवण करून देत त्याने सांगितले की, आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद सोडत आहे. मात्र, आपण तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून खेळत राहणार असल्याचे सांगितले.


बाबर आझमने आतापर्यंत 134 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत 78 सामने जिंकले आहेत. तर 44 सामने हरले आहेत. 1992 च्या विश्वचषक विजेत्या इम्रान खाननंतर बाबर हा दुसरा सर्वात यशस्वी पाकिस्तानी कर्णधार आहे.






शाहीन आफ्रिदी पाकिस्तानचा नवा कर्णधार


बाबर आझमने हकालपट्टी होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा जीव भांड्यात पडला. शान मसूद कसोटी संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे टी-20 ची धुरा देण्यात आली आहे. मात्र, एकदिवसीय संघासाठी अजून कॅप्टन नेमण्यात आलेला नाही. 






मोहम्मद हाफीजकडेही जबाबदारी


माजी पाकिस्तान कर्णधार मोहम्मद हाफीजकडे पाकिस्तान संघाच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पीसीबीने पाकिस्तान कोचिंग स्टाफचा पोर्टफोलिओ सुद्धा बदलला आहे. सर्व प्रशिक्षक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करणे सुरू ठेवतील. पीसीबी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील आगामी मालिकेसाठी योग्य वेळी नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करणार आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या