जिलॉन्ग (ऑस्ट्रेलिया) : मेलबर्न रेनेगेड्सचा मोसमातील पहिला होम मॅच पर्थ स्कॉचर्स विरुद्ध जीएमएचबीए स्टेडियमवर धोकादायक खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला. गिलाँगमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कव्हरखाली आणि खेळपट्टीवर पाणी साचल्याने सामन्यापूर्वी विकेटची चिंता वाढली होती. चिंता असूनही सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.






रेनेगेड्सने गोलंदाजी निवडली


खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अवघड वाटत होती. म्हणूनच रेनेगेड्सने नाणेफेक जिंकली आणि निक मॅडिन्सनने गतविजेत्याला फलंदाजीसाठी पाठवण्यास कोणताही संकोच दाखवला नाही. टॉसच्या वेळी मॅडिन्सन म्हणाला, 'विकेट पूर्णपणे ओली आहे त्यामुळे आम्हाला फक्त काय होणार आहे ते पहायचे आहे.'






स्कॉर्चर्सने सुरुवातीच्या दोन विकेट गमावल्या कारण त्यांच्या फलंदाजांनी दुहेरी उसळीचा सामना केला. भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असलेल्या अॅरॉन हार्डीने फटके मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तो सतत चुकत होता. पण विल सदरलँडचा चेंडू जोश इंग्लिसच्या कंबरेला आदळला. यानंतर पुढील चेंडू वेगवान होता पण तो लूप प्रमाणे विकेटकीपरच्या हातात गेला.






फलंदाजांनी विरोध केला


यानंतर अंपायर यांनी पर्थच्या फलंदाजांशी चर्चा केली. पंचांनी सामना अनिर्णित घोषित करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. सामना रद्द झाल्यानंतर अंपायर ट्रेलोअर म्हणाले की, आम्हाला प्रत्येक संधी द्यायची होती, म्हणूनच आम्ही खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला सर्व काही चांगले दिसत होते आणि आम्ही पहिल्या काही षटकांमध्ये जे पाहिले त्यावरून आम्ही खूप आशावादी होतो. पण शेवटी चेंडू ज्या पद्धतीने पुढे जात होता त्यामुळे तो धोकादायक होता. ही शेवटची डिलिव्हरी होती ज्याने आम्हाला त्या धोकादायक स्थितीत आणले आणि खेळाडूंची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे.


इतर महत्वाच्या बातम्या