मुंबई : राज्यात शनिवार 9 डिसेंबर रोजी एनआयएच्या (NIA) पथकाने धाडसत्र सुरु केलं. महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकरासह (Karnataka) एकूण 44 ठिकाणी एनआयएने छापे टाकले. या छापेमारीत इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 14 जणांना ताब्यात घेण्यात आलाय तर शेकडो जणांची चौकशी सुरू आहे. बोरीवली येथील पडघा भागातून एनआयएच्या पथकाने साकीब नाचन याला ताब्यात घेतले. यावेळी नाचण कुटुंबातील नातेवाईकाचे लग्न होते. पडघ्याशेजारी असणाऱ्या बोरीवली गावात हे लग्न होते. लग्नाची तयारी ऐन रंगात असताना आणि सर्व नातेवाईक लग्नसोहळ्यासाठी एकत्र आले असतानाच एनआयएने छापेमारी केली. 


नाचन कुटुंबातील काही आरोपी या लग्नाला जाणार होते मात्र त्याआधीच छापेमारी आणि अटकेची कारवाई झाली. एनआयएच्या या कारवाईमुळे गावात एकच खळबळ माजली. दरम्यान एनआयएच्या पथकाने अटक केलेल्या कुटुंबातील सदस्य या लग्नाला गेले नाहीत. शिवाय पोलिासांची नजर असल्यामुळे  अनेकांनी बाहेरुनच येणं टाळलं. डघ्यायशेजारील बोरिवली गावात सध्या महाराष्ट्र पोलीस आणि तपासयंत्रणांची विशेष नजर आहे.


या आरोपींना अटक


 मोहम्मद साकीब अब्दुल हमीद नाचण,  रवीश, साकीब, खालिद,  मुख्य आरोपी आणि अटक केलेल्या व्यक्तींचा स्वयंघोषित नेता, याने व्यक्तींना 'बयाथ' (ISIS च्या खलिफाशी युतीची शपथ) देण्याचे अधिकार स्वतःहून घेतले होते.  मुख्य आरोपींव्यतिरिक्त, हसीब झुबेर मुल्ला हसीब झुबेर मुल्ला, काशिफ अब्दुल सत्तार बलेरे, सैफ अतीक नाचन, रेहान अशफाक सुसे, शगाफ सफिक दिवकर, फिरोज दस्तगीर कुवारी, आदिल इलियास खोत, फिरोज दस्तगीर अशी अटक करण्यात आली आहे.  कुवारी, आदिल इलियास खोत, मुसाब हसीब मुल्ला, रफील अब्दुल लतीफ नाचन, याह्या रवीश खोत, रझील अब्दुल लतीफ नाचन, फरहान अन्सार सुसे, मुखलिस मकबूल नाचन आणि मुन्झीर अबुबकर कुन्नाथपीडीकल.  सर्व आरोपी मूळचे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आहेत.


एनआयएचं धाडसत्र


 एनआयएने या कारवाईत शस्त्रास्त्रे, रोख रक्कम, डिजिटल उपकरणे, हमासचे झेंडे जप्त केले आहेत.  जप्त करण्यात आलेल्यांमध्ये एक पिस्तूल, दोन एअर गन, आठ तलवारी/चाकू, दोन लॅपटॉप, सहा हार्ड डिस्क, तीन सीडी, 38 मोबाईल फोन, 10 मॅगझिन बुक्स, रु.  68,03,800 रोख आणि 51 हमासचे ध्वज यांचा समावेश आहे.  या प्रकरणाचा ताबा घेतल्यापासून, एनआयएने विविध ISIS मॉड्यूल आणि नेटवर्क नष्ट करण्यासाठी जोरदार आणि ठोस कारवाई केली आहे.  NIA ने अलिकडच्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत आणि ISIS च्या दहशतवादी कट प्रकरणात अनेक दहशतवादी कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या ISIS मॉड्यूल्सचा पर्दाफाश केला आहे.


हेही वाचा :


Thane News: एनआयएची मोठी कारवाई! ठाणे जिल्ह्यातल्या 41 ठिकाणी छापे, साकीब नाचनसह 14 जणांना घेतलं ताब्यात