- हैदराबाद-बंगलोर संघांमधल्या उद्याच्या हैदराबादमधल्या सामन्याच्या दिवशी अॅमी जॅकसनची अदाकारी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.
- पुणे-मुंबई संघांमधल्या सहा एप्रिलच्या सामन्यानिमित्तानं गहुंजे स्टेडियमवर रितेश देशमुखचा परफॉर्मन्स असेल.
- सात एप्रिलला गुजरात-कोलकाता सामन्याच्या निमित्तानं टायगर श्रॉफ राजकोटच्या स्टेडियमवर परफॉर्म करेल.
- कोलकाता-पंजाब सामन्याच्या निमित्तानं 13 एप्रिलला ईडन गार्डन्सवर श्रद्धा कपूर आणि मोनाली ठाकूर या दोघींचा परफॉर्मन्स असेल.
- 15 एप्रिलला दिल्ली-पंजाब सामन्याच्या निमित्तानं दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर परिणीती चोप्राचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.
- बंगळुरू आणि इंदूरला आठ एप्रिल रोजी, तर मुंबईत नऊ एप्रिल रोजी होत असलेल्या सामन्यांआधीही एखाद्या लोकप्रिय कलाकाराचा परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळणार आहे.
IPL च्या उद्घाटन सोहळ्याच्या 6 रंजक गोष्टी
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2017 08:51 PM (IST)
मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे यंदा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा केवळ सलामीच्या सामन्याच्या एकाच स्टेडियममध्ये नाही तर, पाच सामन्यांच्या अलग अलग स्टेडियम्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.