मुंबई : 2000 रुपयांच्या नोटांनंतर आता लवकरच 200 रुपयांची नोट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टरनी 200 रुपयांच्या नोटा छापण्याच्या प्रस्तावाला परवानगी दिली आहे. 200 रुपयांच्या नोटेमध्ये नवे सुरक्षा मानाकंन असतील, जेणेकरुन बनावट नोटा बनवणं शक्य होणार नाही. यंदा जून महिन्यानंतर 200 रुपयांची नवी नोट चलनात येण्याची शक्यता आहे.

200 रुपयांच्या नोटेचा अद्याप कोणताही अधिकृत फोटो जारी करण्यात आला नाही. मात्र, सोशल मीडियावर 200 च्या नोटेचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडोओ व्हायरल झाले आहेत.



अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवरुन 200 रुपयांच्या नोटेचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यातील कोणताच फोटो खरे नाहीत. कारण अद्याप छपाईलाच सुरुवात झाली नाही. काहींनी तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा फोटो असलेली नोटही व्हायरल केली आहे.



दरम्यान, ‘200 रुपयांची नोट छापण्याची तयारी सुरु आहे. पण केंद्र सरकार जोपर्यंत आदेश देत नाही, तोपर्यंत नोटा छापण्याचं काम सुरु होणार नाही. सरकारच्या आदेशानंतरच 200च्या नव्या नोटा आणण्याच्या योजनेवर काम सुरु होईल,’ असं रिझर्व्ह बँकेतर्फे सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे बनावट नोटांना लगाम लावण्यासाठी सरकार 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांच्या सुरक्षा फीचरमध्ये दर 3 ते 4 वर्षांनी बदल करण्याच्या विचारात आहे. 500-2000 च्या नोटांच्या सुरक्षा फीचरमध्ये दर 3 ते 4 वर्षांनी बदल