लिसेस्टर : महिला विश्वचषकातील बारावा सामना दक्षिण आफ्रिकेने अविस्मरणीय बनवला. वेस्ट इंडिजचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केवळ 48 धावांवर गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि गोलंदाज डेन वाननेही या सामन्यात एकही धाव न देता 4 विकेट घेण्याचा विक्रम केला.


एकही धाव न देता 4 विकेट घेण्याची क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एकही धाव न देता 3 विकेट न घेण्याचा विक्रम महिला वन डेत दोन वेळा आणि महिला टी-20 क्रिकेटमध्ये एक वेळा झालेला आहे.

डेन वानने 3.2 षटकात एकही धाव न देता 3 निर्धाव षटकं टाकली. तर 4 विकेटही नावावर केल्या.

महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघाची वन डेतील ही सर्वाधिक दुसरी कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2008 साली वेस्ट इंडिजचा संघ 41 धावांवरच गारद झाला होता. 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने 6.2 षटकातच 10 विकेट्सने हा सामना जिंकला. वन डेतील हा तिसरा सर्वाधिक जलद यशस्वी पाठलाग आहे. दक्षिण आफ्रिकेने 262 चेंडू राखून हा सामना नावावर केला.