मुंबई : क्रीडाप्रेमींच्या पसंतीस उतरलेल्या प्रो कबड्डी लीगची यंदा आणखी उत्सुकता वाढली आहे. कारण यंदा चार नव्या संघांचा प्रो कबड्डी लीगमध्ये समावेश करण्यात येणार आहे.


स्टार स्पोर्टसच्या प्रो कबड्डी लीगमध्ये जुलैमधल्या आगामी मोसमात चार नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे. नव्या संघांमध्ये तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरयाणाचा समावेश आहे. त्यामुळं आयपीएलच्या पाचव्या मोसमात यंदा आठऐवजी बारा संघ खेळताना दिसतील.

परिणामी प्रो कबड्डी लीगमधल्या एकूण सामन्यांची संख्या 130 वर जाईल. तसंच यंदाचा मोसम हा तेरा आठवड्यांचा असेल.

प्रो कबड्डी लीगची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. विशेषत: तरुणांनी तर प्रो कबड्डी लीगला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. कबड्डीला सेलिब्रेटी टच आणि ग्लॅमर मिळाल्याने एरवी कुठेही चर्चा नसलेल्या या खेळाबद्दलचं आकर्षणही प्रचंड प्रमाणात वाढलं आहे.