पोलीस भरतीत उंची वाढवण्यासाठी पायाला नाणं, आठवड्याभरातील दुसरी घटना
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 29 Mar 2017 06:15 PM (IST)
औरंगाबाद : पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. उंची वाढावी म्हणून एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं. औरंगाबादमध्ये सध्या ग्रामीण विभागाची पोलीस भरती सुरु आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना एका उमेदवाराच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी या तरुणाची तपासणी केली, यावेळी पायाला नाणं लावून उंची वाढवल्याची बाब उघड झाली आहे. पायाला नाणं लावत भरती प्रक्रियेवेळी फसवणूक केल्याप्रकरणी तरुणाविरोधात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मागच्याच आठवड्यात नाशिकच्या पोलीस भरतीत एका तरुणानं उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावला होता. संबंधित बातम्या : पोलीस भरतीत उंचीसाठी केसांचा विग, तरुणाचा पर्दाफाश 'विग घालून उंची वाढवणाऱ्या परीक्षार्थीचा व्हिडिओ व्हायरल का केला?'