कोलंबो: भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एक डाव आणि 147 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह चार दिवसीय सामन्यांची मालिका भारतानं 2-0 अशी खिशात घातली.
या सामन्यात पवन शाहचं द्विशतक आणि अथर्व तायडेच्या दीडशतकी खेळीमुळे भारतानं 613 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा पहिला डाव 316 धावांत आटोपला. दुसऱ्या डावातही श्रीलंकन फलंदाजांनी अवघ्या 150 धावांत लोटांगण घातलं.
VIDEO : अर्जुन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट
भारताकडून सिद्धार्थ देसाईनं दुसऱ्या डावात चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर यतिन मंगवानी आणि आयुष बदोनीनं प्रत्येकी दोन आणि अर्जुन तेंडुलकरनं एक विकेट घेतली.
या कसोटी मालिकेकडे भारताचं लक्ष सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीकडे लागलं होतं. दुसऱ्या कसोटीत अर्जुन तेंडुलकरने पहिल्या डावात 18 चेंडूत 14 धावा केल्या. या डावात तो धावबाद झाला. तर पहिल्या डावात त्याने 15 ओव्हर गोलंदाजी केली. त्यामध्ये त्याने 5 ओव्हर मेडन टाकल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.
दुसऱ्या डावात भारतीय संघाला फलंदाजीसाठी यावं लागलं नाही. मात्र या डावात गोलंदाजी करताना अर्जुनने 9 षटकात 39 धावा देत 1 विकेट घेतली.
दरम्यान, अर्जुनने पहिल्या कसोटीतही दोन्ही डावात 1-1 विकेट घेतल्या होत्या.
संबंधित बातम्या
तेंडुलकर पिता-पुत्रांचा ‘शून्य’ विक्रम
VIDEO : अर्जुन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट
अखेर अर्जुन तेंडुलकरने टीम इंडियाची जर्सी घातली!