भारतीय संघाची 1983 विश्वचषकामधील परिस्थिती अत्यंत नाजूक होती. भारताला अनेकदा दुबळ्या संघांना तोंड देण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागली होती. मात्र भारताच्या शिलेदारांनी आपल्या मेहनतीच्या बळावर अनोखा इतिहास रचून भारताचं नाव इतिहासामध्ये कोरलं.
1983 विश्वचषकातील काही रंजक गोष्टीः
- भारताने त्या काळचा सर्वात मजबूत संघ वेस्ट इडिजला हरवलं.
- भारताला तेव्हा झिम्बाब्वेकडून पराभवाची नामुष्की ओढावली होती. झिम्बाब्वे विरुद्ध भारताची स्थिती 19 धावांवर 5 बाद अशी झाली होती.
- वेस्ट इंडिज हा दोनदाचा विश्वविजेता संघ आहे. वेस्ट इंडिज संघामध्ये सर व्हीव्ह रिचर्ड्स, कर्णधार क्लाईव्ह लॉईड, गॉर्डन ग्रिनीज, डेसमंड हेन्स यांसारखे जगातील सर्वात जबरदस्त खेळाडू होते.
- फलंदाजांसोबतच जोएल गार्नर, माल्कम मार्शल, एंडी रॉबर्ट्स, मायकल होल्डिंग यांच्यासारखे तोफखाना समजले जाणारे गोलंदाज होते.
- झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाची परिस्थिती सुधारत गेली.
- भारताने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 183 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या पाहून भारताचा विजय निश्चित असल्याचं सांगून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर काहींनी खेळाडूंवर टिका केली.
- या धावसंख्येत के. श्रीकांथ यांनी सर्वाधिक 38, तर संदीप पाटील यांनी 27 धावा केल्या होत्या.
- भारताने दिलेल्या माफत धावांचा पाठलाग करताना गोलंदाजांची खरी कसरत लागली. बलविंदर सिंह यांची गोलंदाजी भारताच्या विजयात टर्निंग पॉईंट ठरली.
- मदनलालच्या बॉलिंगवर कर्णधार कपिल देव यांनी घेतलेला झेल सर्वोत्कृष्ट ठरला होता. व्हीव रिचर्ड्स यांनी 7 चौकार लगावले होते.
- मॅन ऑफ दी सिरिज - रॉजर बिन्नी तर मॅन ऑफ दी मॅच- मोहिंदर अमरनाथ, 3 विकेट 12 धावा