चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वात वेगवान अर्धशतक, युवराज एकमेव भारतीय
युवराजने 32 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुवराजने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. जे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात वेगवान पाचवं अर्धशतक आहे. तर भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा युवराज एकमेव फलंदाज ठरला आहे.
भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतक ठोकले. मात्र युवराजने त्याच्या वादळी अर्धशतकासह एक विक्रमही नावावर केला.
पावसामुळे सामना 48 षटकांचा करण्यात आला. युवराज बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्यानेही अखेरच्या षटकात हात धुवून घेतले. त्याने 6 चेंडूत 20 धावा ठोकल्या. याच खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 3 बाद 324 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं.
कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 81, रोहित शर्मा 91, शिखर धवन 68 आणि युवराज सिंहच्या 53 धावांच्या बळावर टीम इंडियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 324 धावांचं आव्हान ठेवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -