शाओमीचा सुपर सेल, Mi4, Mi5 च्या किंमतीत भरघोस कपात
शाओमीने ट्विटरद्वारे या ऑफरची माहिती दिली आहे. Mi4 च्या किंमतीत 4 हजार रुपयांची ऑफर आहे, तर Mi5 वर 2 हजार रुपयांची ऑफर आहे. तीन दिवस ही ऑफर असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाओमी Mi5 मध्ये 5.15 इंच आकाराची स्क्रिन असून 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. 820 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे.
Mi5 चा कॅमेरा या फोनचं खास आकर्षण आहे.
शाओमी Mi4 ची बॅटरी आणि ऑपरेटींग सिस्टीम चांगली असल्याचं बोललं जातं.
Mi4 ला 5 इंच आकाराची स्क्रिन आहे, तर 13 मेगापिक्सेल रिअर आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Mi4 ची लाँचिंग प्राईस 14 हजार 999 रुपये आहे. सध्या हा फोन 10 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे. Mi5 ची किंमत 24 हजार 999 रुपये होती. सध्या हा फोन 22 हजार 999 रुपयांत मिळत आहे.
शाओमीने कंपनीचे दोन वर्ष पूर्तीच्या निमित्ताने सुपर सेल सुरु केलं आहे. शाओमीने Mi4 आणि Mi5 या स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -