सिनेमात हिरो-हिरोईनने घातलेल्या कपड्यांचं काय होतं?

सिनेकलाकारांच्या फॅन्सची कमी नाही. आपल्या आवडत्या कलाकारांनी वापलेल्या वस्तूंसाठी ते लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात. सलमानच्या एका चाहत्याने तर 'मुझसे शादी करोगी'मधील एका गाण्यात सलमानने वापरलेला टॉवेल दीड लाखांना खरेदी केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मात्र अनेक वेळा असंही होतं की, प्रसिद्ध डिझायनर सिनेमा झाल्यानंतर स्वत:चे कपडे परत घेऊन जातात. मनिष मल्होत्रा आणि अंजू मोदी हे बऱ्याचदा डिझाईन केलेले त्यांचे कपडे परत घेतात.

अनेक वेळा कपड्यांचा लिलाव होता. यामधून मिळणारी रक्कम दान केली जाते. 'देवदास' सिनेमात माधुरी दीक्षितने परिधान केलेला हिरव्या रंगाच्या लहंग्याची तब्बल 3 कोटी रुपयांना विक्री झाली होती.
यापैकी अनेक महागडे कपडे एका पेटीत टाकून त्यावर सिनेमाचं नाव लिहून प्रॉडक्शन हाऊसमध्ये ठेवतात.
लिलावाशिवाय अनेक वेळा कलाकारांना ते कपडे एवढे आवडतात की, ते स्वत:सोबत घेऊन जातात. फिल्ममेकरही आनंदाने ते कपडे देतात. त्यापैकी बरेच कपडे कलाकार घालू शकत नाही, मात्र आठवण म्हणून स्वत:कडे ठेवतात.
तर कधी असंही होतं की, हे कपडे मिक्स अँड मॅच करुन नव्या कॉम्बिनेशनसह ज्युनिअर आर्टिस्ट्सना घालण्यासाठी दिले जातात.
सिनेमात अभिनेता-अभिनेत्रींचे कॉस्ट्यूमही विशेष भूमिका निभावतात. व्यक्तिरेखेनुसार फॅशन डिझायनर कपडे बनवतात. सध्या सिनेमात कॉस्ट्यूमचंही चांगलं बजेट असतं. पण कलाकारांनी एकदा हे कपडे वापरल्यानंतर त्याचं काय होतं, हे आम्ही सांगणार आहोत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -