मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या हिरोंनी मनंही जिंकली, काय केलं पाहा
भारत आणि बांगलादेश संघांमधल्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामिवीर रोहित शर्मानं कालचा विजय 87 वर्षांच्या चारुलता पटेल यांच्या बरोबर साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामना जिंकल्यानंतर अशा पद्धतीनं टीम इंडियाच्या शिलेदारांनी ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन केलं.
विराट कोहली आणि रोहित शर्मानं सामना संपल्यानंतर चारुलताबेन यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
चारुलताबेन यांनी विराट आणि रोहितला आजीच्या ममतेनं कुरवाळत दोघांचा लाडानं मुकाही घेतला.
92 चेंडूच्या आपल्या खेळीमध्ये रोहितने 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. रोहित शर्माने मारलेला एक षटकार प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या मीनाला लागल्याने तिला दुखापत झाली.
विराटनं चारुलता पटेल यांचा खास उल्लेख करुन, त्यांच्यासोबतचे आपले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
र्मिंगहॅमच्या एजबॅस्टनवर कालच्या सामन्यादरम्यान 87 वर्षांच्या चारुलता पटेल यांची उपस्थिती सर्वात लक्ष वेधून घेणारी ठरली
सामना संपल्यानंतर भारताच्या उपकर्णधारानं मीनाची भेट घेऊन तिची आस्थेनं चौकशी केली. रोहितनं मग तिला ऑटोग्राफ करून एक कॅपही भेट दिली. त्यामुळं मीनाची कळी भलतीच खुलली.
टीम इंडियाच्या बांगलादेशवरच्या विजयाचा शिल्पकार रोहित शर्मानं त्या सामन्यानंतर एका भारतीय चाहतीची आवर्जून भेट घेतली. या तरुण चाहतीचं नाव मीना आहे. रोहितनं आपल्या शतकादरम्यान मारलेल्या एका षटकारानं मीनाला दुखापत झाली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -