गोलंदाज नव्हे, पराभवाचं कारण 'हे' होतं : विराट कोहली
भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल कालच्या सामन्यातला सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांमध्ये एकही विकेट न घेता 64 धावा दिल्या. जयदेव उनाडकट 2 आणि शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, विराटने दक्षिण आफ्रिकेला या विजयाचं पूर्ण क्रेडिट दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी जो खेळ केला तो पाहता तेच विजयाचे प्रबळ दावेदार होते. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, असं म्हणत विराटने प्रतिस्पर्धी संघाचंही कौतुक केलं.
क्लासेनने तीन चौकार आणि सात षटकारांसह 69 धावांची खेळी उभारली. ड्युमिनीने चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 64 धावांची खेळी केली.
या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. जेपी ड्युमिनी आणि हेन्रिच क्लासेनने तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 93 धावांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला विजयपथावर नेलं.
पावसामुळे अडचणी आल्याचंही विराटने सांगितलं. पावसामुळे चेंडू ग्रिप करणं कठीण झाल्याचं विराटने सांगितलं.
भारताच्या गोलंदाजीवेळी 12 व्या षटकानंतर सुरु झालेल्या पावसाने अडचणी आणखी वाढवल्या, त्यानेच मोठं नुकसान झालं, असं विराटने सांगितलं.
हा सामना गोलंदाजांसाठी अवघड होता. सुरुवातीच्या विकेट लवकर गमावल्यानंतर आम्हाला 175 च्या आसपास धावा करण्याची अपेक्षा होती. मनीष पांडे आणि सुरेश रैना यांच्या खेळीने अपेक्षा वाढल्या. त्यानतंर महेंद्रसिंह धोनीने शानदार खेळी करत मोठी मजल मारुन दिली, असंही विराट म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेचं चांगलं प्रदर्शन हे भारताच्या पराभवाचं कारण होतं, असं कर्णधार विराट कोहली म्हणाला. हा दिवस भारतीय गोलंदाजांचा नव्हता, असंही त्याने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.
दक्षिण आफ्रिकेने सेन्चुरियनच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.