जिओ DTH ची सुविधा सहा महिने मोफत?
ट्विटर यूझर @prem_chettri यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये रजिस्ट्रेशनसोबत सहा महिन्यांपर्यंत ग्राहकांना मोफत डीटीएच सुविधा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका रिपोर्टनुसार, जिओ डीटीएच सुविधा जुलै 2017 पर्यंत लॉन्च करु शकते.
एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे, टेलिकॉमप्रमाणेच डीटीएच सर्व्हिसमध्येही बंपर ऑफरसोबत पदार्पण करेल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटबाबत जिओ केअरकडे चौकशी केली असता लक्षात आले की, जिओने या सुविधेच्या कमर्शियल लॉन्चिंगबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. अधिकृत लॉन्चिंगवेळी जिओकडून सर्व ग्राहकांना सांगितले जाणार आहे.
टेलिकॉमप्रमाणेच डीटीएचच्या क्षेत्रातही पहिल्या सहा महिन्यांसाठी फ्री वेलकम ऑफर देण्यात येणार असल्याचा दावा आहे.
या स्क्रीनशॉटनुसार जिओच्या या सुविधेमध्ये 432 चॅनल मिळतील, ज्यामध्ये 350 हून अधिक एसडी (स्टँडर्ड डेफिनेशन) आणि 50 हून अधिक एचडी (हाय डेफिनेशन) क्वालिटीचे असतील.
जिओ होम DTH (डायरेक्ट टू होम) सर्व्हिस लवकरच लॉन्च करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की DTH सुविधेसाठी रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -