1 किलोचा मूतखडा, 72 वर्षीय वृद्धावर यशस्वी शस्त्रक्रिया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमूतखडा किंवा किडनी स्टोन हा आजकाल सर्रास ऐकायला मिळणारा शब्द आहे. कोणाच्या पोटातून किती मोठा मूतखडा काढला याबाबत अनेक आश्चर्यकारक माहिती ऐकायला मिळते. तशीच काहीशी घटना मुंबईजवळच्या वसईत घडली आहे.
एवढा मोठ्या वजनाचा मूतखडा भारतात तरी अजून सापडला नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. आता याची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न आहेत.
एवढा मोठा मूतखडा ऑपरेशन करून बाहेर काढणे हे डॉक्टरांसाठी आव्हान होतं. कारण त्या रुग्णाला हृदयाचा त्रास होता. तसेच त्या रुग्णाचे मूत्राशय कृत्रिम होते. तरीही डॉक्टरांनी हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले.
हा मूतखडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. मात्र शस्त्रक्रियेद्वारे मूतखडा काढल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण हा मूतखडा तब्बल 1100 ग्रॅम म्हणजे 1 किलोहून अधिक वजनाचा होता. तर त्याचा आकार 13.5 सेंटीमीटर X 7 सेंटीमीटर इतकी होती.
वसईच्या नायगांवमध्ये राहणारे एडवर्ड वॉर्नर हे ७२ वर्षाचे रुग्ण मूतखड्यामुळे त्रस्त होते. त्यांनी उपचारासाठी डॉ. देवेंद्र पाटील यांची भेट घेतली. वॉर्नर यांच्या तपासण्या केल्या असता, त्यांना मूतखडा असल्याचं समोर आलं.
एका रुग्णाच्या पोटातून तब्बल एक किलोचा मूतखडा शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला आहे. वसईत डॉक्टर देवेंद्र पाटील यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -