Unseen Photos: ब्रेन सर्जरीनंतर हृतिक रोशनचे फोटो समोर, आईने लिहिली भावुक पोस्ट
पिंकी रोशन यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'ऑपरेशनला जाताना त्याचे डोळे तसेच होते जसे लहानपणी असायचे', असंही त्या म्हणाल्या.
पिंकी रोशन यांनी पुढे लिहिलं आहे की, 'जेव्हा दुग्गू ब्रेन सर्जरीसाठी जात होता तेव्हा मी बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत होते. माझ्या हृदयाचे ठोके, वाढणारं ब्लड प्रेशर, माझ्या ओठांवर असलेली प्रार्थना, माझं संपूर्ण शरीर चिंताग्रस्त होतं.'
हृतिक रोशनची आई पिंकी रोशनने काही फोटो पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की, 'आज मी जड अंतकरणाने काही फोटो शेअर करत आहे. दरम्यान याबाबत मनात कोणतीही खंत नाही कारण यासाठी कोणतंही दुःख, निराशा किंवा चिंता नाही. यासोबत मन भरून आलं आहे. मला अभिमान आहे की, मी दुग्गूची आई आहे. ज्याप्रकारे आपली वागणूक असते त्याप्रकारे आपण एक उदाहरण सेट करत असतो.'
अनेकदा हृतिकने स्वतः याबाबत सांगितले आहे की, त्याला बालपणी स्पष्ट बोलता येत नव्हतं, बोलताना तो अडखळत बोलत असे. याव्यतिरिक्त त्याला घशाच्या समस्यांचाही सामना करावा लागला होता. पिंकी रोशन यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर यूजर्स अनेक कमेंट्स करत आहेत. त्याचबरोबर अने बॉलिवूड सेलिब्रिटीही या पोस्टवर कमेंट करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनने 10 जानेवारीला आपला 46वा वाढदिवस साजरा केला. हृतिकने आल्या आयुष्यात अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना केला. त्याच्या 46व्या वाढदिवशी ऋतिकची आई पिंकी हृतिकने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली असून त्याचसोबत हृतिकचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -