हातात फलक घेऊन ठिकठिकाणी उभं राहून बीडमध्ये गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन
गावकरी मागण्यांचं फलक घेऊन रस्त्यावर बसले आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजोपर्यंत ह्या मागण्या मान्य आणि सुरु होत नाहीत तोपर्यत उपोषण करत राहणार असे उपोषणकर्ते प्रा. अरविंद जाधव, वैजनाथ जाधव, अंकुश जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
6. मोहकुळ तांडा येथे रस्त्यावर एलईडी लाईट लावून देण्यात यावे
5. मोहकुळ तांडा येथील जिल्हा परिषद -शाळेचे शौचालय नीट करून देण्यात यावे.
4. मोहकुळ तांडा येथे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
2. मोहकुळ तांडा येथे समाज मंदिर देण्यात यावे.
1.रेखा नाईक तांडा ते मोहकुळ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेपर्यंत डांबरी/ सिमेंट रस्ता तयार करुन देणे.
या आंदोलकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे
कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेत आणि शासकीय नियमावली पाळत उपोषण सुरु केलं आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात या तांड्याला जाण्यास रस्ता नसतो. पिण्यास पाणी अशुद्ध मिळते तर घाणीचे साचलेले पाणी हे आजारांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी माजलगाव तहसीलच्या गेटच्या बाजूला उपोषण सुरु केलं आहे.
माजलगाव तालुक्यातील नित्रुड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोहकुळ तांडा हा मागील अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. इथल्या नागरिकांनी अनेक वेळी शासन दरबारी हक्काच्या सुविधा मिळाव्यात म्हणून कागदी घोडे नाचवले पण त्याची दखल घेतली नाही.
अनेक वेळा शासनदरबारी मागणी करुन सुद्धा प्रश्न सुटत नसल्याने गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
बीडच्या माजलगाव शहरामध्ये एका आंदोलनाने सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. शहरातील परभणी टी पॉईंट आणि शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावर नागरिक ठिकठिकाणी हातामध्ये फलक घेऊन उभे आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -