Teera Kamat | अन् तीराला संजीवनी देणारं औषध अखेर आज मिळालं

अजून एक दिवस तिला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि शनिवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून, तिला घरी सोडण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुरुवारी हे औषध अमेरिकेतून रुग्णालयात पोहचले, हे औषध देण्याचा परवाना हिंदुजा रुग्णालयाकडे आहे. शुक्रवारी हे औषध तीराला सलाईन मार्फत देण्यात आले.

गेली काही महिने तीराच्या पालकांनी हे औषध तीराला मिळावे यासाठी मोठा संघर्ष केला. आज अखेर तिला हे औषध देण्यात आले असून तिची तब्येत लवकर ठिक व्हावी म्हणून तीरासाठी अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या, त्या सर्वासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.
अमेरिकेतील औषधं भारतात आणण्यासाठी आयात शुल्क भरावे लागते, त्याकरिता आणखी 2-5 कोटी रुपये इतकी रक्कम लागणार होती. मात्र, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून औषधांवरील कर माफ करण्यात आला आहे.
अनेक मित्र नातेवाईक विशेष म्हणजे अनोळखी व्यक्तींनी यासाठी मदत केली.
सोशल मीडियाचा क्राउड फंडिंगच्या वेबसाईटचा आधार घेत रात्र-दिवस मेहनत करून काही महिन्यात पैसे जमा झालेही.
या उपचारासाठी आवश्यक असणारी इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये असून ती गोळा करण्याकरिता क्राउड फंडिंगचा पर्याय निवडला गेला.
मुंबईतील सहा महिन्याच्या तीरा कामतला रिप्लेसमेंट उपचारांची गरज असून 'झोलजेन्स्मा’ हे औषध हवे होते, ते अमेरिकेतून आले आणि आज डॉक्टरांनी ते औषध तीराला दिले आहे.
अशा पद्धतीने या आजारावर औषध मिळणारी तीरा मुंबईतील दुसरं मूल असून यापूर्वी अशाच स्वरूपाचे इंजेक्शन एका बाळाला महिन्यापूर्वीच याच रुग्णालयात देण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत 11 बाळांना हे औषध देण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -