धोनीची अधुरी प्रेम कहाणी, माहीच्या दु:खद लव्हस्टोरीचा खुलासा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयादरम्यान आंतरराष्ट्रीय किकेटसाठी धोनीचे परदेश दौरे सुरु होते. बिझी शेड्यूलमुळे तो प्रियांकाला भेटूही शकत नव्हता.
प्रियांच्या मृत्युच्या धक्कातून धोनी वर्षभर सावरलाच नव्हता. प्रियांकाची आठवण येऊ नये म्हणून त्याने स्वत:ला क्रिकेटमध्ये बिझी ठेवलं.
2002 मध्ये, जेव्हा धोनी विशीत होता, स्ट्रगल करत होता, त्यावेळी प्रियांका त्याच्यासोबत होती. संपूर्ण आयुष्य सोबत घालवायचं असं वचन त्यांनी एकमेकांना दिलं होतं. मात्र त्याच काळात म्हणजेच 2003-04 मध्ये झिम्बाब्वे आणि केनिया दौऱ्यासाठी 'भारत अ' संघात धोनीची निवड झाली. त्यानंतरच्या काही मालिकांमधील त्याच्या कामगिरीकडे सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांचं लक्ष गेलं आणि 2004 मध्ये त्याची भारताच्या वन डे संघात निवड झाली.
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंहच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. धोनीबाबत माहित नसलेल्या काही गोष्टी या चित्रपटातून उलगडणार आहेत. धोनीच्या जीवनातील अशीच एक महत्त्वाची घटना म्हणजे त्याची पहिली प्रेयसी.
नीरज पांडे दिग्दर्शित 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात धोनीच्या आयुष्यातील अनेक घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यापैकी एक म्हणजे त्याचं पहिलं प्रेमाचा, त्याची प्रेयसी, असं वृत्त 'मुंबई मिरर'ने प्रकाशित केलं आहे.
यानंतर महेंद्रसिंग धोनीने 4 जुलै रोजी साक्षी रावतसोबत लगीनगाठ बांधली. या दोघांच्या संसाराच्या वेलीवर 'जिवा' नावाचं सुंदर फूल उमललं. आता धोनी साक्षी आणि जिवासह आनंदाचं आयुष्य जगत आहे.
होय, साक्षी धोनीच्या आयुष्यात येण्यापूर्वी त्याचं प्रियांका झा नावाच्या तरुणीवर जीवापाड प्रेम होतं. इतकंच नाही तर आयुष्यभर एकत्र राहायच्या आणाभाकाही दोघांनी घेतल्या होत्या. पण नियतीला हे मान्य नव्हतं. एका अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -