सुषमा स्वराज : सहृदयी व्यक्तिमत्व ते कार्यकुशल आक्रमक नेत्या
उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्ती अशा अनेक उपमा ज्यांना कमी पडतील अशा माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं दु:खद निधन झालं.
त्यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली
2003-2004 दरम्यान त्यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले,
. 2014 ते 2019 या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मोदींच्या परराष्ट्र धोरणांमध्ये स्वराज यांचा कायमच महत्वाचा वाटा राहीला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा एनडीएकडून पंतप्रधानपदासाठीचे नाव जाहीर झाले नव्हते, तेव्हा स्वराज यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती.
2014 ते 2019 या काळात सुषमा स्वराज या देशाच्या पूर्णवेळ परराष्ट्रमंत्री होत्या.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2000-2003 दरम्यान त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले.
13 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर 1998 या काळात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिला.
1977 मध्ये त्या हरयाणाच्या अंबाला छावणी विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा निवडून आल्या
त्यानंतर काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. त्यांचे पती स्वराज कौशलही याच काळात सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते.
लोकांच्या मदतीसाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. त्यांची सेवा आणि योगदान देश कदापी विसरणार नाही
13 जुलै 1975 मध्ये त्यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला
14 फेब्रुवारी 1952 मध्ये हरयाणातील अंबाला छावणीमध्ये सुषमा स्वराज यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.
1977 साली वयाच्या 25 व्या वर्षी सुषमा स्वराज हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाल्या.
तसेच त्यांनी दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला.
बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 12 ते 3 पर्यंत भाजपच्या केंद्रीय कार्यालयात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता लोदी रोडच्या विद्यूत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.