वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला मोदी, मनमोहन, सोनियांसह दिग्गजांची हजेरी
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाजपेयींचं अंत्यदर्शन घेतलं.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक यशवंत सिन्हा यांनी श्रद्धांजली वाहिली
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी वाजपेयींचं अंत्यदर्शन घेतलं.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही अटल बिहारी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी वाजपेयींच्या पार्थिवावर फुले वाहिली
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शोक व्यक्त करत वाजपेयींना आदरांजली वाहिली.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला सपत्नीक आले होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वाजपेयींचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी श्रद्धांजली वाहिली
योगगुरु बाबा रामदेवही वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला पोहोचले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातील दिग्गज नेते हजर होते. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वात आधी तीनही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ध्वज चढवला. वाजपेयींचं पार्थिव काल रात्री अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरीच ठेवण्यात आलं होतं. तिथे अनेकांनी दर्शन घेतलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाजपेयींच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -