मालवण किनाऱ्यावर माशांचा खच, तब्बल 70 टन तारली मासे!

समुद्रकिनाऱ्यावर तब्बल 60 ते 70 टन तारली मच्छी सापडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोठ्या प्रमाणात तारली मासळी किनाऱ्यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली.

यानंतर मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मासेमारीस प्रारंभ केला. पण याचदरम्यान मालवण किनारपट्टीवर मात्र तारली मच्छीचा अक्षरश: खच पाहायला मिळत आहे
चार दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी वादळाने कोट्यवधींचं नुकसान केलं आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे वादळ शांत झालं.
'ओखी' वादळच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या आणि त्यामुळेच तारलीसारखे मासे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आले, असा अंदाज जुने-जाणते मच्छीमार व्यक्त करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -