मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा ताजमहालवर दावा

चित्रपटाची कथा भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका शेतकऱ्यावर आधारीत आहे. या चित्रपटातील शेतकरी चक्क ताजमहालच्या जमिनीवर आपला दावा सांगत, न्यायालयात दाद मागतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या चित्रपटाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ”या चित्रपटाचा विषय पूर्णपणे हटके आहे. दिग्दर्शक अजित शर्मा यांनी या चित्रपटाची ऑफर दिली, त्यावेळी त्यांना मी त्यांना या चित्रपटाची कथा एका वाक्यात सांगण्यास सांगितले. त्यावर शर्मा यांनी चित्रपटाची कथा एका शेतकऱ्याची असून, तो ज्या जमीनीवर आपला दावा सांगत आहे, त्या जमीनीवर आज ताजमहल उभा आहे, असे सांगितले. त्यानंतर मला चित्रपटात अधिकच आवड वाढली

या चित्रपटात श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारत असून मंजिरी फडणीस त्याच्यासोबत काम करत आहे.
मुंबई: मराठमोळ्या अभिनेता श्रेयस तळपदेने चक्क ताजमहालवर दावा केला आहे. मात्र हा दावा त्याने रिअल लाईफमध्ये नव्हे तर रिल लाईफमध्ये केला आहे.
श्रेयस तळपदेचा ‘वाह ताज’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात श्रेयस तुम्हाला ताजमहालच्या जमिनीसाठी संघर्ष करताना दिसणार आहे. ‘वाह ताज’ 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -