बर्थ डे स्पेशल : 'या' सिनेमांनी शाहरुखला 'रईस' बनवलं
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आज 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखने बॉलिवूडच्या 25 वर्षांच्या कारकीर्दीत 90 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. मात्र यातील काही सिनेमांनी शाहरुखला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरब ने बना दी जोडी : आपण रोमान्स किंग असल्याचंही शाहरुखने या सिनेमातून दाखवून दिलं.
देवदास : हा सिनेमा शाहरुखच्या करिअरमधील अविस्मरणीय सिनेमा म्हणून ओळखला जातो.
चक दे इंडिया : 2007 साली आलेल्या या सिनेमात शाहरुखने हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारली. शाहरुखच्या अभिनयाने या सिनेमाला घवघवीत यश मिळवून दिलं.
वीर झारा : शाहरुखच्या रोमँटीक सिनेमांमध्ये या सिनेमाचा क्रमांक पहिला लागतो. सिनेमातील गाण्यांची जादू आजही कायम आहे.
माय नेम इज खान : करण जोहर दिग्दर्शित या सिनेमातील शाहरुखच्या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाला चांगलं यश मिळालं.
स्वदेस : या सिनेमाने भारतातच नव्हे तर जगभरातून कौतुकाची थाप मिळवली.
मोहब्बते : 2000 साली रिलीज झालेल्या या सिनेमातील शाहरुखची भूमिका चाहत्यांना आजही तेवढीच आवडते.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे : 20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने शाहरुखला नवी ओळख दिली. या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर 10 फिल्मफेअर अॅवॉर्ड आपल्या नावावर केले.
डर : 1993 साली आलेल्या या सिनेमात शाहरुखच्या हटके भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं.
रईस : कित्येक वर्षांनी शाहरुख सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसून आला. सिनेमातील शाहरुखचे डायलॉग आणि पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान सोबतच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली.
कुछ कुछ होता है : या सिनेमाला एकूण आठ फ्लिम फेअर अवार्ड मिळाले असून शाहरुख खानला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवार्ड मिळाला आहे.
हॅप्पी न्यू इअर : या सिनेमातील लव्ह-कॉमेडी-डान्सचा ट्रिपल तडका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला.
दिलवाले : एसआरके-काजोल ही जोडी पुन्हा एकदा रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांसमोर आली.
चेन्नई एक्सप्रेस : दीपिका पदुकोण-शाहरुख खान यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भुलली. या सिनेमाने 200 कोंटींपेक्षा अधिक कमाई केली.