सॅमसंग गॅलक्सी नोट 8 12 सप्टेंबरला भारतात!
गॅलक्सी नोट 8 चे फीचर्स : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 64 GB, 128 GB आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट, दोन अॅप एकावेळी चालणार, व्हर्चुअल असिस्टंट Bixby, 3300mAh क्षमतेची बॅटरी, फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट, ब्ल्यूटूथ 5.0 (फोटो : ट्विटर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगॅलक्सी नोट 8 चे फीचर्स : अँड्रॉईड 7.1.1 नॉगट, 6.3 इंच आकाराची एचडी स्क्रीन (Quad HD+ Super AMOLED), IP68 वॉटरप्रूफ, 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा (10X पर्यंत झूम फीचर), 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (फोटो : ट्विटर)
सॅमसंगने गॅलक्सी नोट 8 ची किंमत अमेरिकेत 59 हजार रुपये ठेवली आहे, तर इंग्लंडमध्ये या फोनची किंमत 71 हजार रुपये आहे. मात्र भारतात या फोनची किंमत किती असेल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. (फोटो : ट्विटर)
एकीकडे आयफोन 8 अमेरिकेत लाँच केला जाईल, तर दुसरीकडे भारतीय ग्राहकांसाठी सॅमसंग गॅलक्सी नोट 8 हा स्मार्टफोन आणणार आहे. सॅमसंगने या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिलेली नाही. मात्र याच दिवशी फोन लाँच होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. (फोटो : ट्विटर)
12 सप्टेंबर रोजी सॅमसंगने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यामध्ये नुकताच जगभरात लाँच करण्यात आलेला गॅलक्सी नोट 8 हा स्मार्टफोन भारतात आणला जाईल, असा अंदाज लावला जात आहे. (फोटो : ट्विटर)
मुंबई : अॅपलचा नवा फोन आयफोन 8 12 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. याच दिवशी भारतात गॅलक्सी नोट 8 हा स्मार्टफोन लाँच करण्याचं सॅमसंगनेही निश्चित केल्याची माहिती आहे. (फोटो : ट्विटर)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -