Irfan Khan | कँडिड फोटो शेअर करत इरफानसोबतच्या आठवणींना बॉलिवूडकरांचा उजाळा!
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडासोबतचा इरफानचा खास फोटो (Photo Credit: Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुरू रंधावासोबतचा इरफानचा खास फोटो. (Photo Credit: Instagram)
अभिनेत्री हुमा कुरैशीनेही इरफानसोबतचा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. (Photo Credit: Instagram)
शुटिंगमधील हा फोटो श्रद्धा कपूरने शेअर केला आहे. (Photo Credit: Instagram)
अवॉर्ड इव्हेंटमधील फोटो शेअर करत अभिनेता वरुण धवनने इरफान खानसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Photo Credit: Instagram)
राधिका मदाननेही 'अंग्रेजी मीडियम'च्या सेटवरील फोटो शेअर करत इरफान खानसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Photo Credit: Instagram)
अभिनेता बॉबी देओलने इरफानसोबतचा फोटो शेअर करत त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली आहे. (Photo Credit: Instagram)
त्याचबरोबर रणवीर सिंहने इरफान खानसोबत फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये इरफान खान रणवीर सिंहला मिठी मारताना दिसून येत आहे. (Photo Credit: Instagram)
रणवीर सिंहने इरफान खानसोबतचा फोटो शेअर करत हार्ट ब्रेकचं इमोजी शेअर केला आहे. (Photo Credit: Instagram)
अभिनेत्री करीना कपूर खानने इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम' च्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. दरम्यान, 'अंग्रेजी मीडियम' इरफान खानचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर, राधिका मदान दिसून आल्या होत्या. (Photo Credit: Instagram)
अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही इरफान खानसोबतचा शुटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. (Photo Credit: Instagram)
अभिनेता सलमान खानने इरफान खानचा एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान, हा फोटो एका अवॉर्ड इव्हेंटमधील आहे. (Photo Credit: Instagram)
बॉलीवुड अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन हिने इरफान खानसोबत एक फोटो शेअर करत एक इमोशनल कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने इरफान खानच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या बच्चनही दिसून येत आहे. (Photo Credit: Instagram)
बॉलिवूड अभिनेता इरफान खानने वयाच्या 54व्या वर्षी 29 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील कोकीलाबेन रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इरफान खानच्या फॅन्सपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी इरफानला श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच सेलिब्रिटींनी इरफान खानसोबत आपले कॅडिड फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -