अन् ऑलिम्पिकमध्ये एक अनोखा चमत्कार!
डिरोला आता आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे. तसेच सोमवारी होणाऱ्या या स्पर्धेतील ती एक प्रबळ दावेदार मानली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइथोपिया, आयर्लंड आणि जमैकाच्या संघाकडून करण्यात आलेला विरोध पाहता डिरो तसंच आयर्लंडच्या सारा ट्रेसे आणि जमैकाच्या आयशा प्रॉटला अंतिम फेरीसाठी पात्र ठरवण्यात आलं.
अंतिम रेषा पार केल्यावर डिरो रनिंग ट्रॅकवरच कोसळली. फायनलमध्ये न पोहचल्याचं तिला अतीव दु:ख झालं आणि तिथंच तिला रडू कोसळलं. तिला वाटलं की, आपण हातातील संधी दवडली, पण तिला जसं वाटत होतं तसं मात्र झालं नाही.
इथोपियाच्या या 25 वर्षीय धावपटूनं पूर्ण जिद्दनं धावणं सुरु केलं. या प्रकारात पहिल्या तिघींना थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला. मात्र, डिरोला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
दुसऱ्या प्रतिस्पर्धीच्या एका चुकीमुळं डिरोच्या एका पायातील बूट निघाला. तिनं बूट घालण्याचा प्रयत्नही केला. पण त्यामुळे वेळ निघून जात असल्याचं तिला जाणवलं आणि त्यामुळे तिनं बूट घालणं सोडून दिलं. एका पायात बूट न घालता तिनं धावणं सुरुच ठेवलं.
महिलांच्या 3000 मी. स्टीपलचेसमध्ये प्रबळ दावेदार मानण्यात येत होती. तिनं सुरुवातीला चांगली बढतही घेतली होती. पण अचानक झालेल्या एका अपघातानं ती काही काळ थांबली.
इथोपियाची धावपटू इतनेश डिरोनं रिओ ऑलिम्पिकमध्ये 3000 मी. स्टीपलचेस प्रकारात 800 मीटर अंतर एक बूट न घालताच पूर्ण केलं. तिच्या याच जिद्दीमुळे तिला या प्रकारातील अंतिम फेरीत स्थान देण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -