नाशिकला मुसळधार, गोदावरीला पूर, अनेक मंदिरं पाण्याखाली
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 03 Aug 2019 02:59 PM (IST)
1
पुराची ओळख असलेला दुतोंडया मारूतीही थोड्याच वेळात बुडणार आहे.
2
रामकुंडाच्या बाहेर रस्त्यावर आले पाणी. कपालेश्वर समोरची स्थिती
3
नाशिकच्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी खास करून हा पूर बघण्यासाठी औरंगाबादहून पर्यटक नाशकात दाखल झाले आहेत.
4
पुराची ओळख असलेला दुतोंडया मारूतीही थोड्याच वेळात बुडणार असून हा पूर बघण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडले आहेत.
5
गोदावरीला यामुळे पूर आला असून अनेक छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत.
6
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चांगलाच बरसत असल्याने गंगापूर धरण 88 टक्के भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात येतोय.
7
नाशिकला गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरु असून आज सकाळपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे.